स्पेक्ट्रम प्रकरणी द्रमुकची 10 जूनला बैठक

June 8, 2011 5:44 PM0 commentsViews: 6

08 जून

2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या द्रमुकची 10 जूनला एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे. द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांची मुलगी कनिमोळीचा जामीन अर्ज आज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला. तसेच माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारनही आता 2 जी घोटाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. या कठीण प्रसंगावर द्रमुकच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान कनिमोळी घोटाळ्यात सहभागी असल्याचे पुरेसे प्राथमिक पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय कनीमोळी यांचं राजकीय स्थान बघता त्यांच्याकडून तपासात अडथळे आणले जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळत असल्याचे कोर्टाने सांगितलं. कोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे द्रमुकचे नेते टी. आर. बालू यांनी म्हंटलं आहे. कनिमोळी गेल्या 19 दिवसांपासून तिहार जेलमध्ये आहेत. कनीमोळी यांच्या बरोबरचे कलैगनार टिव्हीचे एमडी शरद कुमार यांचाही जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला आहे.

close