कुरार हत्याकांडात 5 आरोपींना अटक

June 8, 2011 5:53 PM0 commentsViews: 1

08 जून

मुंबईच्या मालाड येथे कुरार इथं 4 तरुणांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं. या तरुणांची हत्या उदय पाठक आणि त्याच्या साथीदारांनीच केल्याचे आता तपासातून पुढे आले आहे. पण याप्रकरणातील सगळे 9 आरोपी फरार होते. त्यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. वैभव चव्हाण, बोलू चौबे, अमित सोनी, हेमंत गुप्ता, रश्मीकांत खत्री अशी त्यांची नावं आहेत. तर 4 संशयित अद्याप फरार आहेत. या हत्याकांडातील मुख्य आरोपी उदय पाठक हा फरार आहे.

close