भारतासमोर 241 धावांचे लक्ष

June 8, 2011 6:03 PM0 commentsViews: 1

08 जून

त्रिनिदादला सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील दुसर्‍या वन-डेमध्ये वेस्ट इंडिजच्या बॅट्समननी संयमी खेळ करत भारतासमोर 241 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. पण विंडीजचे ओपनर्स सिमॉन्स आणि एडवर्डने संयमी खेळ करत टीमला चांगली सुरूवात करून दिली.

पण अमित मिश्राने एडवर्डला आऊट करत वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर मैदानात उतरलेल्या सरवानने सिमॉन्सच्या मदतीने पुन्हा एकदा टीमचा स्कोअर वाढवायला मदत केली. पठाणने पहिल्यांदा सिमॉन्स आणि त्यानंतर सॅम्युयल्सला आऊट केलं. वेस्ट इंडिजने 50 ओव्हर्समध्ये ते अडीजशेचा टप्पा पार करतील अशी शक्यता होती पण 241 धावांचे आव्हान देऊ शकले.

close