नाशिक स्फोट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल

June 9, 2011 9:52 AM0 commentsViews: 4

09 जून

नाशिकच्या सप्तश्रृंगी अपार्टमेंटमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी पंचवटी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदा स्फोटकांचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यात फटाक्यांचा व्यापार्‍याचाही समावेश आहे. यापैकी गुरनानी आणि वाघ या स्फोटातच दगावले आहे.

मराठी फायर वर्क्स या नावानं गुरनानीचा रासेगावला फटाक्यांचा कारखाना आहे. त्यासाठीचा कच्चामाल भरण्यासाठी त्याने हा गाळा भाड्याने घेतला होता. मात्र रांगोळी तयार करण्याचं खोटं कारण सांगण्यात आल्याचं पुढे आलं आहे.

दरम्यान सायबर कॅफेच्या गाळ्याचा मालक गवई कालपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. तर पोलीस ललित पागेचा शोध घेत आहेत. दुसरीकडे घटनास्थळी रस्त्यावर आलेल्या कुटुंबांच्या महत्त्वाच्या वस्तू मिळवून देण्यासाठीचं काम सुरू आहे.

close