अल्पवयीन मुलीशी लग्नाचा हट्ट जिवावर बेतला

June 9, 2011 12:39 PM0 commentsViews: 3

09 जून

अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा हट्ट धरणार्‍या एका इसमाला करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जवळ घडली आहे. औरंगाबादपासून 30 किलोमीटरवरच्या टाकळीवाडीत ही घटना घडली. मूलबाळ होत नाही म्हणून अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा हट्ट रायसिंग घुनावतने धरला होता.

या मुलीच्या घरच्यांनी नकार देऊनही तो मुलीच्या घरासमोरून चकरा मारायचा मंगळवारी संध्याकाळी रायसिंग घरासमोरुन जात असताना या मुलीच्या घरच्यांनी त्याला झाडाला बांधून बेदम मारलं. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीघांना अटक करण्यात आली आहे.

close