यंग ब्रिगेडची कमाल विंडीजवर सलग दुसरा विजय

June 9, 2011 10:05 AM0 commentsViews: 2

09 जून

भारताने विंडीज दौर्‍यात सलग दुसर्‍या वन डेत विजयाची नोंद केली आहे. त्रिनिदादला खेळवल्या गेलेल्या दुसर्‍या वन डेत भारताने यजमान वेस्ट इंडिजचा 7 विकेट राखून पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 241 रन्सचं आव्हान ठेवलं होतं.

याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन झटपट आऊट झाला. पण पार्थिव पटेल आणि विराट कोहलीने मात्र जम बसवला. 22 ओव्हरमध्ये या जोडीने भारताला 100 रन्सचा आकडा गाठून दिला.

पण यानंतर पावसाने हजेरी लावली आणि खेळ थांबवण्यात आला. तब्बल 1 तासाच्या ब्रेकनंतर खेळ पुन्हा सुरु झाला. आणि डर्कवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर 90 बॉलमध्ये 83 रन्सचे नवे टार्गेट ठेवण्यात आलं.

पार्थिव पटेल, विराट कोहली आणि सुरेश रैनाच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने हे आव्हान 3 विकेट गमावत पार केलं. पार्थिव पटेल 56 तर कोहली 81 रन्स करुन आऊट झाले. रैनाने नॉटआऊट 26 रन्स करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयाबरोबरच भारताने 5 वन डे मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.

close