काही काळ पाऊस ओसरण्याची शक्यता

June 9, 2011 12:45 PM0 commentsViews: 8

09 जून

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर राज्यभरात पाऊस पडत होता. पण सध्या काही काळासाठी हा पाऊस कमी होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. साधारण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकत होता. पण सध्या त्याचा प्रवास काहीसा मंदावला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सध्या मान्सून पूर्वेकडे आगेकूच करत असल्याचं सांगण्यात येतं आहे. कोकण तसेच मुंबईमध्ये मान्सून पोहचला आहे. पण अजूनही मराठवाडा आणि विदर्भात मान्सून पोहचलेला नसल्याचं सांगितलं जातं आहे.

close