बाबांनी दिला गुंगारा ; ट्रस्टचा मांडला हिशेब

June 9, 2011 2:06 PM0 commentsViews: 7

09 जून

रामलीला मैदानावर फाईव्ह स्टार आंदोलन उभारणार्‍या बाबा रामदेव यांनी आज संपत्ती जाहीर करण्याची घोषणा केली होती. पण संध्याकाळीपत्रकार परिषद घेऊन बाबा रामदेव यांनी आपल्या चार ट्रस्टमार्फत जनसेवेसाठी केल्या जाणार्‍या खर्चाची माहिती दिली. पण आपल्या संपत्तीची माहिती मात्र त्यांनी दिली नाही.

त्यांनी दिलेल्या खर्चाचा तपशील तुम्हाला www.divyayoga.com वेबसाईटवर पाहता येणार आहे. आपल्या ट्रस्टचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. तसेच सशस्त्र दलासंदर्भात आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचंही बाबा रामदेव यांनी सांगितलं आहे. दरम्यान उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने बाबांनी आता लिंबू सरबत आणि मध घेण्याची तयारी दाखवली आहे.

वेगवेगळ्या ट्रस्टमार्फत आपण जनसेवेसाठी खर्च करत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. यात 1995 पासून कार्यरत असलेल्या दिव्य योग मंदिर ट्रस्टमार्फत आतापर्यंतच 685 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.

तर पतंजली योगपीठ ट्रस्टमार्फत 53 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आलेत. भारत स्वाभिमान ट्रस्टमार्फत 11 कोटी 51 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. तर आचार्य कूलमार्फत 34 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

बाबा रामदेव यांच्या 4 ट्रस्टची भांडवल दिव्ययोग मंदिर ट्रस्ट – 249 कोटी 63 लाख रुपये. – पतंजली योग मंदिर ट्रस्ट – 164 कोटी 80 लाख रुपये- भारत स्वाभिमान ट्रस्ट – 9 कोटी 97 लाख रुपये – आचार्य कुलुंभ शिक्षण संस्था – 1 कोटी 69 लाख रुपये

close