एम.एफ. हुसेन..एक चित्रकार ते चित्रपटकार

June 9, 2011 2:42 PM0 commentsViews: 66

09 जून

मकबुल फिदा हुसेन. चित्रकार म्हणून ओळख असलेले हुसेन, हे खर्‍या अर्थानं कलंदर कलावंत. आणि याच त्यांच्या कलंदरपणातून सिनेमांची निर्मिती झाली. 1967 साली त्यांनी पहिला सिनेमा बनवला. तो म्हणजे थ्रू द आईज ऑफ पेंटर. बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाला गोल्डन बिअर मिळालं होतं.

पण एम.एफ. हुसेन चर्चेत राहिले ते गजगामिनी आणि माधुरी दीक्षितमुळे. हुसेन हे माधुरीचे निस्सिम चाहते. त्यांनी तिचा हम आप के है कौन सिनेमा इतक्या वेळा पहिला की त्याची गणतीच होऊ शकणार नाही. आणि त्यातूनच माधुरीला घेऊन सिनेमा बनवायचा मोह त्यांना झाला. गजगामिनीमध्ये स्त्रीची विविध रूपं माधुरीच्या रूपातून दाखवली होती. त्यात कालिदासाही होती आणि मोनालिसाही.

त्यानंतर तब्बूला घेऊन त्यांनी मीनाक्षी -अ टेल ऑफ थ्री सिटीज् बनवला. इथेही आपल्याला वेगवेगळ्या रुपातली स्त्री भेटली. स्त्रीच्या विविध अंतरंगाचे हुसेन यांना कुतूहल होतं. आणि ते नेहमीच त्यांच्या कलाकृतीतून प्रकट व्हायचं. आणि आता हुसेन यांच्या आत्मचरित्रावर सिनेमा बनतोय.

द मेकिंग ऑफ द पेंटर आणि त्यात श्रेयस तळपदे हुसेन यांची भूमिका साकारतोय. हा सिनेमा येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत हुसेन यांनी रंगवलेले कॅनव्हास अगदी मोठ्या पडद्यावरीलसुध्दा आपल्या मनात कायमच राहतील.

close