पुण्यात शिवरकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला कलमाडींना आमंत्रण

June 9, 2011 4:44 PM0 commentsViews: 2

09 जून

पुण्यात विठ्ठलराव शिवरकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन समारंभात महापालिकेने पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनाही आमंत्रित केलं आहे. त्याच्या निषेधार्थ पुणे महापालिकेमध्ये भाजप युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आलं. सध्या तिहार जेलमध्ये असलेल्या कलमाडींना बोलावले त्याबद्दल अभिनंदन असं म्हणतं भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

तसेच कलमाडींना तिहारवरून पुण्यात येता यावं यासाठी पैसे गोळा करून ते महापालिका आयुक्त महेश पाठक यांना देण्यात आले. मात्र सध्या विरोधकांना काम नसल्यामुळेच ते अशी आंदोलन करत असल्याची टीका कलमाडी समर्थक आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी केली. महापालिकेच्या प्रोटोकॉल प्रमाणेच खासदार म्हणून कलमाडींचे नाव महापौरांनी या पत्रिकेमध्ये छापलं त्यात चुकीचं काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

close