महागाईच्या दरात पुन्हा वाढ

June 9, 2011 12:10 PM0 commentsViews: 5

09 जून

गेले काही दिवस आवाक्यात आलेल्या महागााईच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. 28 मे ला संपलेल्या आठवड्यासाठी महागाईचा दर 9.01 टक्के होता. त्यापूर्वीच्या आठवड्यात हा दर 8.06 टक्के होता. गेल्या 2 महिन्यातील हा उच्चांक आहे.

त्यापूर्वी 26 मार्चच्या आठवड्यात महागाईचा दर 9.18 टक्के होता. 28 मेला संपलेल्या आठवड्यात फळं आणि कांद्याची किंमत वाढल्याने महागाईचा दर वाढला आहे. त्याचबरोबर दूध, अंडी, मांस – मच्छी यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. महागलेलं इंधन आणि त्यामुळे काही प्रमाणात वाढलेल्या किंमती याचा परिणाम महागाईच्या दरावर पहायला मिळतोय.

close