आदर्श प्रकरणी विलासराव देशमुख यांना प्रतिज्ञापत्रासाठी मुदतवाढ

June 9, 2011 12:16 PM0 commentsViews:

09 जून

आदर्श घोटाळ्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना प्रतिज्ञापत्र सादर करायला न्यायालयीन आयोगाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता देशमुख 17 जूनला आपलं प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत.

याआधी नगरविकास खात्याचे तत्कालीन प्रधान सचिव रामानंद तिवारी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आदर्शला महत्त्वाच्या परवानग्या विलासराव देशमुखांनीच दिल्याची माहिती दिली होती.

तसेच आदर्शला इरादा पत्र आपण सत्तेवर येण्यापूर्वीच देण्यात आलं असं म्हणत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी विलासारांकडेच बोट दाखवलं होतं. त्यामुळे विलासराव आपल्या प्रतिज्ञापत्रात या सर्व मुद्यांवर काय स्पष्टीकरण देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. कारण यावर चौकशीची पुढची दिशाही अवलंबून आहे.

close