जयसुर्याचं लंकेच्या टीममध्ये पुनरागमन

June 9, 2011 5:25 PM0 commentsViews: 1

09 जून

श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने लंकन टीममध्ये अनपेक्षितपणे कमबॅक केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि वन डे सीरिजसाठी त्याची टीममध्ये निवड झाली आहे. श्रीलंकेचा कॅप्टन तिलकरत्ने दिलशान अंगठ्याच्या दुखापतीमुळे निदान सुरुवातीच्या वन डेत खेळू शकणार नाही. तर दुसरा ओपनर उपुल थरंगा डोपिंग आरोपामुळे टीमबाहेर आहे. त्यामुळे अखेर लंकन निवड समितीने जयसूर्याला ओपनर म्हणून पसंती दिली आहे. जयसूर्या 42 वर्षांचा आहे. आणि 2009 पासून तो वन डे मॅच खेळला नाही.

close