नाशिक स्फोटाला प्रशासकीय कार्यालय जबाबदार

June 10, 2011 10:12 AM0 commentsViews: 4

10 जून

नाशिकच्या सप्तश्रृंगी बिल्डिंगमधील स्फोटाला प्रशासकीय कार्यालयामधील समन्वयचं जबाबदार असल्याचं पुढे आलंय. नाशिकच्या या स्फोटातला प्रमुख आरोपी मनोहर गुरनानी याला 2007 मध्ये नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाने नोटीस बजावली होती.

मात्र नवी मुंबईतल्या संयुक्त विस्फोटक विभागाचा परवाना पुढे करून गुरनानीने महापालिकेच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे तेव्हापासूनच गुरनानीच्या फटाके विक्री आणि बनवण्याच्या उद्योगाच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला होता. मात्र भरवस्तीत चाललेल्या या उद्योगाबद्दल महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन या सर्वांनीच दुलर्क्ष केल्याचे आता सिद्ध झालं.

close