नदीपात्रात 9 अर्भक सापडली

June 10, 2011 10:22 AM0 commentsViews: 5

10 जून

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये 9 अर्भक सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही सर्व अर्भकं मुलींची आहेत. परळीतल्या नदीपात्रात ही अर्भक सापडली आहे. काल 6 अर्भकं सापडली होती. तर आज पुन्हा तीन मुलींचीच अर्भकं सापडली आहेत.

दोन दिवसांत ही मुलींची अर्भकं सापडूनही पोलीस आणि प्रशासन मात्र स्वस्त आहे. या घटनेची पोलिसांनी अजून दखलच घेतलेली नाही. अजूनही कोणताच गुन्हा नोंदवण्यात आला नाही. बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी आहे. परळी तालुक्यात तर मुलींच्या भ्रूणहत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे. पण, प्रशासन मात्र ढिम्म असल्याचं दिसतं आहे.

close