बाबा रामदेव हॉस्पिटलमध्ये दाखल

June 10, 2011 10:39 AM0 commentsViews: 2

10 जून

बाबा रामदेव यांचे हरिव्दार येथे सुरु असलेलं उपोषण आता तुटलं आहे. बाबांची काल पासून तब्येत खालावली होती. आज बाबांना डेहराडूनच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. सध्या बाबांना सलाईनवर ठेवण्यात आलं आहे. रामदेव बाबांचा पल्स रेट कमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. रामदेव बाबा स्व:ताहून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला तयार झाल्याचे प्रशासकीय अधिकार्‍यांचे जरी म्हणणं असलं तरी रामदेव बाबांना मात्र जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याचा त्यांच्या समर्थकांनी आरोप केला आहे.

close