पावसाच्या दमदार हजेरीने वाहतुकीची कोंडी

June 10, 2011 12:05 PM0 commentsViews: 6

10 जून

राज्यात मान्सूनने आता जोर धरायला सुरूवात केली आहे. मात्र काही ठिकाणी या पावसाचा चांगला तडाखा बसला आहे. मुंबई आणि कोकणात पावसाने पुन्हा हजेरी लावली. मुंबईत कालपासून पाऊस सुरू आहे. यामुळे हवेत गारवा आला आहे. कुठल्याही भागात पाणी साचलं नसल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी सकाळी अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी साचल होतं.

यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवरच्या वाहतुकीची कोंडी झाली होती. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने ईस्टन एक्स्प्रेस हायवेवर ट्रॅफिक जॅम झाली होती. मुंबई शहराकडे येणार्‍या रस्त्यावर सुमन नगर परिसरात ट्रॅफिक जॅम अजूनही कमी झालेलं नाही. सुमन नगर ते चेंबूरपर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेसच्या ट्रॅफिक जॅममध्ये भर पडली आहे. जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवर आणि पवईमध्येही ट्रॅफिक जॅम आहे. तर मुंबई एअरपोर्टवरच्या विमानं दुसरीकडे वळवण्यात आली.

close