छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला 10 पोलीस शहीद

June 10, 2011 12:24 PM0 commentsViews: 3

10 जून

छत्तीसगडमधील दंतेवाड्यामध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाले आहे. तर 3 जण जखमी झाले आहे. नक्षलवाद्यांनी ऍण्टी लँड माईन व्हॅन उडवली. दंतेवाडातल्या कटीकल्याण भागात ही घटना घडली आहे.

गटन गावाजवळच्या पुलाजवळ पोलिसांची जीप पोहचताच नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. त्या पाठोपाठ पोलिसांवर गोळीबारही केला. त्यात 7 स्पेशल पोलीस ऑफिसर्स आणि 3 पोलीस जवान शहीद झाले आहे. 3 जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या एक महिन्यातला हा पाचवा हल्ला आहे. त्यात 33 जवानांनी जीव गमावला आहे.

close