अणु प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तारापूरमध्ये मॉकड्रील

June 11, 2011 10:01 AM0 commentsViews: 2

11 जून

ठाणे जिल्ह्यातील तारापूर इथं अणूउर्जा प्रकल्प सुरक्षेसाठीचे मॉकड्रील घेण्यात येत आहे. भारतभरात अनेक ठिकाणी असे अशी मॉकड्रील होणार आहेत याची सुरवात तारापूरपासून झाली आहे. वेंगणी गावात हे मॉकड्रील सुरु आहे. आज सकाळपासून हे मॉकड्रील सुरु झाले आहे.

यात डॉक्टरांनी माहिती देणं,ओषधी वस्तू पुरवणं अशा गोष्टी या मॉकड्रीलमध्ये आहेत. यासगळ्यांसाठी लागणारा वेळ तपासला जाणार आहे. जपानमध्ये झालेल्या अणूविसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे मॉकड्रील सुरु आहे. मात्र या मॉकड्रीलविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.

पण या मॉकड्रीलला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर आपण सुसज्ज आहोत का याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.

close