बाबांचे उपोषण आठव्या दिवशीही सुरूच

June 11, 2011 10:05 AM0 commentsViews: 1

11 जून

भ्रष्टाचाराविरोधी उपोषणाला बसलेले बाबा रामदेव आठव्या दिवशीही उपोषणावर ठाम आहेत. सरकारने त्यांच्याशी थेट बातचीत करायला नकार दिला आहे. मात्र बाबांसोबत दुसर्‍या मार्गाने वाटाघाटी सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कायदामंत्री वीरप्पा मोईलींनी श्री श्री रवीशंकर यांना रामदेवबाबांचे मन वळवायला विनंती केली.

सूत्रांनी असंही सांगितलं की, स्वामी अग्नीवेश यांनी शुक्रवारी प्रणब मुखर्जी यांची भेट घेतल्यावर सरकारचं म्हणणं आहे की रामदेवबाबांचे उपोषण तोडायला कोणीही पुढे येऊ शकतं. प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन रामदेवबाबा आणि त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली.

close