वसई-विरारमध्ये अनधिकृत 30 इमारती भुईसपाट

June 10, 2011 4:11 PM0 commentsViews: 3

10 जून

वसई विरार महानगरपालिकेन अतिक्रमण विरोधी कारवाई करत चार मजली तीस इमारती आणि 50 फाऊंडेशन उद्धवस्त केले. नालासोपारा पूर्वेकडे सर्वे नंबर 22 ते 34 डंपिंग ग्राउंडसाठी आरक्षित होते. या जागेवर गेल्या काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात अतिक्रमण होत होती. गेल्या पाच दिवसांपासून महापालिकेन कारवाई करत ही बांधकाम तोडली. या कारवाईसाठी 3 पोकलेन आणि 3 जेसीबीचा वापर करण्यात आला. वसई तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच कारवाई क रण्यात आली.

close