संततधार पावसाने मुंबई मंदावली

June 11, 2011 10:19 AM0 commentsViews: 1

11 जून

मुंबईत काल शुक्रवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. शुक्रवारी रात्रीपासून पावसाची ही संततधार सुरूच आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक मंदावली आहे.

दादरच्या हिंदमाता जवळची वाहतूक ब्रिजवरुन वळवण्यात आली आहे. तिन्ही मार्गावरच्या लोकल ट्रेन्सची वाहतुकही विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली असून गाड्या 20 – 25 उशीराने तर हार्बर मार्गावरच्या गाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत झालं आहे. पश्चिम रेल्वेची वाहातुकसुद्धा मंदावली आहे.

आज शहरात झालेल्या पावसाची नोंद कुलाबा वेध शाळेनं नोंद केली आहे त्यानुसार 102.6 मिली मीटर पावसाची नोंद आहे. तर सांताक्रूझमध्ये सकाळी 60 मिली मीटर तसेच पश्चिम उपनगरांमध्ये 32 मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर दुसरीकडे कोकणात खेडमध्ये गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. खेडमधून वाहणार्‍या जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शहराजवळून वाहणार्‍या या नदीचं पात्र कचर्‍यांने भरलेलं आहे. आणि दुर्गंधी पसरली आहे.

खेड नगरपालिकेत कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था नसल्याने, खेड शहरातील कचरा नदीच्या किनार्‍यावर आणि पात्रात टाकला जातो. हा कचरा आता पुराच्या पाण्या बरोबर शहरात शिरतोय की काय अशी नागरीकांना भीती वाटत आहे.

close