महायुती आणि पंधरा हजार लोक ही कसली शक्ती – राणे

June 10, 2011 4:29 PM0 commentsViews: 1

10 जून

शिवशक्ती-भीमशक्तीच्या मेळाव्यावर सडकून टीका करत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. तीन पक्ष आणि पंधरा हजार लोक याला कसली शक्ती म्हणायची असे राणे म्हणाले.

जैतापूर प्रकरणात शिवसेनेनं पाचशे कोटी रूपये घेतल्याविषयी विधानसभेत प्रश्न आला तर तिथे पुरावे देईन असेही राणे यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितलं. औरंगाबाद इथं नवं उद्योग धोरण ठरवण्यासाठी राणे यांनी एक बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांंशी बोलताना राणे यांनी शिवशक्ती भीमशक्तीच्या मेळाव्यावर सडकून टीका केली.

close