नाशिकमध्ये हॉलीडे एक्सप्रेसचे डबे घसरले ; सर्व गाड्या रद्द

June 11, 2011 10:44 AM0 commentsViews:

11 जून

इगतपुरीजवळ आज पहाटे 1.30 च्या सुमारास हॉलीडे एक्सप्रेसचे चार डबे घसरले.पंचवटी, गोदावरी आणि तपोवन या नाशिकहून मुंबईकडे जाणार्‍या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर विदर्भ एक्सप्रेस, पंजाब मेल, हबीबगंज एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस आणि मंगला एक्सप्रेस या नाशिकमार्गे मुंबईला जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाडया पुण्याहून वळवण्यात आल्या आहेत.

दरम्यान प्रवाशांसाठी नाशिक रोडपासून इगतपुरीपर्यंत आणि इगतपुरीपासून मुंबईपर्यंत एसटी ची बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर या घटनेत 10 – 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आलंय.

close