मुंबईवर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी राणाची सुटका

June 10, 2011 4:53 PM0 commentsViews: 2

10 जून

मुंबईवर हल्ल्याच्या कटाचं षडयंत्र रचल्याच्या आरोपातून तहव्वूर राणाची शिकागो कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. पण नॅशनल इनव्हेस्टीगेटिव्ह एजन्सी राणाला आणि हेडलीला मुंबई हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला या हल्ल्यात सामील असलेल्या आयएसआयच्या अधिकार्‍यांवरही कारवाई करणे भाग पडणार आहे.

तहव्वूर राणा. लष्कर-ए-तोयबाला सामुग्री पुरवली म्हणून दोषी ठरलेला आरोपी. पण मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून त्याला दोषमुक्त केलं आहे. पण यावर कायदेतज्ज्ञांनी मत नोंदवलं आहे. पण काही तज्ञांच्या मते मात्र हा निकाल योग्य आहे. कारण मुंबई हल्ल्याचे षडयंत्र रचल्याप्रकरणी वकीलांकडे पुरेसे पुरावे नव्हते.

शिकागो कोर्टाच्या निकालावर भारत सरकारने मात्र टीका केलेली नाही. नॅशनल इनव्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने केलेल्या तपासावर या निकालाचा अजिबात परिणाम होणार नाही असं केंद्रीय गृहखात्याने म्हटलं आहे. डेव्हिड हेडली आणि राणाचा ताबा मिळाल्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी भारत सरकारनंही तयारी केली आहे.

- त्यांच्याविरूद्धच्या पुराव्यांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा तपास करतील- शिकागोमधील पुरावे हे अतिरिक्त पुरावे म्हणून वापरणार- एफबीआयची मदत घेण्याचा प्रयत्न करणार- या दोघांना अमेरिकेत गाठण्याचा प्रयत्न करणार- आयएसआयच्या अधिकार्‍यांचा षडयंत्रातल्या सहभागाचे पुरावे शिकागोमधल्या तपासामधून मिळवण्याचा प्रयत्न करणार

मेजर इक्बाल आणि मेजर समीर अली या लष्करी अधिकार्‍यांची चौकशी आणि त्यांच्या तपासाबाबत भारत सरकार पाकिस्तानवर दबाव आणण्याची तयारी सुरु आहे.

तहव्वूर हुसैन राणाला शिकागो कोर्टाने 26/11 च्या हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपातून जरी निर्दोष मुक्त केलं असलं तरी इतर काही प्रकरणात त्याला दोषी धरण्यात आलं आहे.

राणावरचे आरोप

- मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात मदत करणे – डेन्मार्कमधल्या एका वर्तमानपत्राच्या ऑफिसवर हल्ल्याचा कट – लष्कर-ए-तोयबाला मदत पुरवणे

close