आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : अर्भकांच्या हत्येप्रकरणी लवकरच कारवाई !

June 11, 2011 12:42 PM0 commentsViews: 5

11 जून

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये 9 अर्भक सापडल्याची खळबळजनक घटना काल शुक्रवारी आयबीएन लोकमतने दाखवली होती. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिलं. तसेच जल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली.

बीडमध्ये एका नाल्यात काही स्त्री अर्भकं सापडली होती. ही सर्व अर्भकं मुलींची आहेत. परळीतल्या नदीपात्रात ही अर्भक सापडली आहे. गुरूवारी 6 अर्भकं सापडली होती. दुसर्‍यादिवशी पुन्हा तीन मुलींचीच अर्भकं सापडली.

दोन दिवसांत ही मुलींची अर्भकं सापडूनही पोलीस आणि प्रशासन मात्र याबाबात कोणतीही दखल घेतली नाही. या प्रकरणी शुक्रवारपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आयबीएन लोकमतने या बातमीचा पाठपुरावा केला. आणि अखेर दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिलं.

close