"बुढ्ढा होगा तेरा बाप !"

June 11, 2011 12:55 PM0 commentsViews: 1

11 जून

शाहरुख खानवर मात करुन ओरिजनल डॉन आता परतला आहे. बुढ्ढा होगा तेरा बाप या सिनेमातून. हा एव्हरग्रीन डॉन म्हणजेच अमिताभ बच्चन या सिनेमात त्यांचे फेमस डायलॉग्स बोलताना दिसतील.बीग बीची बॉलिवूडचा ओरिजनल अँग्री यंग मॅन ही इमेज बरीच वर्ष लोकांच्या स्मरणात राहिली. 70 ते 80 च्या दशकात त्याच्या प्रत्येक भूमिकेचं भरपूर कौतुकही झालं. अमिताभने कधीच त्याच्या खास स्टाईलमधले डायलॉग्स बोलणं आणि अँग्री यंग मॅन च्या भूमिका करणं सोडलं नाही.

या सगळ्यामुळे प्रभावीत झालेली पुढची जनरेशन देखील बच्चनचे तेच सिनेमे करुन पुढे जाताना दिसत आहे. शाहरुख खानने नवीन डॉन तेवढ्याच ताकदीने उभारला आणि त्याने डॉन 2 चं शूटिंग सुद्धा संपवलं आहे.

तेव्हा बीग बी ला सुद्धा त्याच्या सिनेमातील डॉयलॉग वापराचे आहेत यात काहीच शंका नाही. बुढ्ढा होगा तेरा बाप या सिनेमाने बीग बीचं पुनरागमन होत आहे. यात तो पॅरिसमध्ये राहणार्‍या रिटायर्ड हिटमॅनच्या भूमिकेत दिसेल जो भारतात नोकरीसाठी येतो. बीग बी अँग्री ओल्ड मॅन हे त्याचं ट्रम्प कार्ड वापरण्यात कुठेही कमी पडला नाही. पण त्याची ही इमेज बॉक्स ऑफिसवर लोक कशी स्विकारतील हे लवकरच कळेल.

close