अंतराळाची अनोखी सफर..

June 11, 2011 1:27 PM0 commentsViews: 2

11 जून

अंतराळ दिसत कसं, अंतराळवीरांचे खास कपडे कसे असतात आणि अंतराळ यान कसं असतं. या सगळ्यांबद्दल तुम्हाला जर कुतुहल असेल तर मग मुंबईतल्या नेहरु तारांगणाला जरुर भेट द्या. इथे सुरू असलेल्या प्रदर्शनात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. या प्रदर्शनाच्या उदघाटनाला रशियाचा अंतराळवीर व्हिक्टर साविंक मुंबईत आला होता. या प्रदर्शनात अंतराळवीरांचे फोटो डॉक्युमेन्टेशन आणि छायाचित्र प्रदर्शनसाठी ठेवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 18 जूनपर्यंत सुरू असणार आहे.

close