अखेर बाबांनी उपोषण सोडले

June 12, 2011 9:41 AM0 commentsViews: 2

12 जून

बाबा रामदेव यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर बाबा रामदेव यांनी 9 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं. मोसंबीचा ज्यूस पिऊन बाबांनी उपोषण सोडलं. डेहराडूनमधील हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससमध्ये बाबा रामदेव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बाबा रामदेव यांचं दिल्लीतील आंदोलन उधळल्यानंतर ते हरिद्वारमध्ये उपोषण करत होते. मात्र तिथे त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं आणि बाबांची एकही मागणी सरकारने मान्य केली नाही.

मात्र बाबांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारने विनंती केली होती. बाबांच्या माघारीमुळे सरकारचा मात्र विजय झाल्याचं मानलं जातंय. उपोषण मागे घेतलं असलं तरी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं बाबा रामदेव यांच्या अनुयायांनी सांगितलं आहे.

close