ज्येष्ठ पत्रकार जे.डे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

June 12, 2011 9:59 AM0 commentsViews:

12 जून

जेष्ठ पत्रकार ज्योतीर्मय डे यांच्यावर आज अतिशय भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक पत्रकार आणि राजकीय नेते उपस्थित होते. काल जे.डे यांची भरदुपारी हिरांनदानी परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. संपूर्ण देशभरातून या हत्येचा निषेध करण्यात येतोय.

काल रात्री जे जे हॉस्पिटलमध्ये जे. डे यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. सकाळी 9 वाजता जे. डे यांचा मृतदेह त्यांच्या घाटकोपर इथल्या घरी आणण्यात आला. यावेळी जे. डे यांचे अनेक सहकारी उपस्थित होते. दरम्यान पोस्ट मार्टम अहवालात अनेक गोष्टी समोर आल्या आहे.

हल्लेखोरांनी जे. डे यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या होत्या. छातीच्या डाव्या बाजुला या सर्व गोळ्या झाडण्यात आल्यात. त्यातील एक गोळी उजव्या खांद्यात अडकून बसली होती. तर उर्वरीत चार गोळ्या शरीरातून आरपार बाहेर निघाल्या.

अहवालात हल्लेखोरांनी डे यांना अंत्यत जवळून गोळ्या घातल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान डे यांच्या पार्थिवाचे त्यांच्या सहकार्‍यांनी अंत्यदर्शन घेतलं. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ही डे यांना श्रध्दाजंली वाहिली. दरम्यान सोनिया गांधी यांनी जे. डे यांच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

close