‘वल्गन भरली, खवळा लागेल गळाला’ !

June 12, 2011 10:26 AM0 commentsViews: 6

12 जून

पावसाळा सुरू झाला आणि नदी नाले तुडुंब वाहु लागले की कोकणात शेतकर्‍यांची लगबग सुरू होते ती मळ्यातले मासे पकडण्याची. पाऊस झाल्यावर नदी, ओढे आणि नाले वाहु लागतात आणि त्यामुळेच हे मासे शेतात येतात. त्याला कोकणात 'वल्गन भरली' असं म्हणतात.

वल्गन म्हणजे नदीचं पाणी पाटातून ओढ्यात घेणं. गोड्या पाण्यातील हे चविष्ट मासे फक्त याच दिवसात मिळतात. आणि हे मासे पकडले जातात ते पूर्ण पारंपरिक पध्दतीनं. छत्री टाकून, जाळं टाकून आणि काठीने सुध्दा हे मासे पकडले जातात 'वल्गन भरली, खवळा लागेल गळाला ' असं म्हणत शेतकर्‍यांची दिवस रात्र ही मासेमारी सुरू असते.

close