पावसामुळे हाल झाल्याबद्दल उध्दव ठाकरेंनी केली दिलगिरी व्यक्त

June 12, 2011 2:58 PM0 commentsViews: 3

12 जून

शनिवारी मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी भरलं होतं. त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना सहन करावा लागला. बर्‍याच ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झालीही होती. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेनं नालेसफाईचे केलेले दावे शनिवारी झालेल्या पावसात उघडे पडले आहे. त्यामुळे मुंबईकरांना नालेसफाई झाल्याचे सांगणार्‍या उध्दव ठाकरेंनी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त केली. पालिकेच्या अधिकार्‍यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि मुंबईकरांना दिलेल्या आश्वासनांची पुर्ती न झाल्यामुळे त्यांच्यावर दिलगिरी मागण्याची वेळ आली.

close