मुंडेंच्या राज्यभरात कार्यकर्त्यांशी गुप्त भेठीगाठी

June 13, 2011 5:56 PM0 commentsViews: 5

13 जून

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे नाराज असल्यामुळे शिवशक्ती भीमशक्ती मेळाव्यास हजर राहत नव्हते. त्यांच्या नाराजीचे कारण म्हणजे पक्षातील त्यांचं कमी होत असलेलं महत्व सांगितलं जातं आहे. आणि म्हणूनचं गोपीनाथ मुंडे यांनी आता कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणं सुरु केल्या आहेत.

कार्यकर्त्यांचा आपल्या मागे असणार्‍या कार्यकर्त्यांच्या पाठबळाची चाचपणी करण्यासाठी मुंडे यांनी या भेटीगाठी वाढवल्याचे म्हटलं जातं आहे. नुकत्याच झालेल्या नगर जिल्ह्यातील दौर्‍यात मुंडे यांनी भेटीगाठींचा सपाटा लावला होता. नगर आणि पाथर्डी तालुक्यातही गुप्त दौरे करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्याची सुत्रांची माहीती आहे.

दरम्यान गोपीनाथ मुंडे हे सध्या नाराज असले तरी ते तूर्तास पक्षाला सोडचिठ्ठी देणार नाहीत असे संकेत त्यांच्या मराठवाड्यातील नजीकच्या कार्यकर्त्यांनी दिलेत.

close