आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांना प्रतिज्ञापत्रासाठी पुन्हा मुदतवाढ

June 13, 2011 11:32 AM0 commentsViews: 2

13 जून

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 20 जूनपर्यंत मुदतवाढ मागितली होती.

ती न्यायालयीन आयोगाने मान्य केली आहे. मात्र येत्या 17 जूनला केंद्रीय ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख आपलं प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. त्यानंतर 20 जूनला अशोक चव्हाण प्रतिज्ञापत्र सादर करतील.

ही मुदतवाढ मागण्यामागे विलासराव देशमुख यांच्या प्रतिज्ञापत्रातील मुद्दे लक्षात घेऊन त्यानंतर आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा चव्हाणांचा हेतू आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे विलासराव देशमुखसुद्‌धा मुदतवाढ मागतात की ठरल्याप्रमाणे 17 जूनला प्रतिज्ञापत्र सादर करतात याबद्दलची उत्सुकता आहे.

close