एनआयए हेडलीची पुन्हा एकदा चौकशी करण्याची शक्यता

June 12, 2011 4:14 PM0 commentsViews: 3

12 जून

नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी म्हणजेच एनआयए मुंबई हल्ल्याचा आरोपी डेव्हिड हेडली याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या शिकागो कोर्टाने तहव्वुर राणा याला मुंबई हल्ल्याच्या आरोपातून मुक्त केले आहे.

एनआयए कोर्टाच्या या निर्णयाचा अभ्यास करेल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे तज्ञांशी सल्लामसलत केला जाईल. आणि त्यानंतर याप्रकरणात पुढे काय पाऊल उचलायचं हे ठरवण्यात येईल असं एनआयएच्या सूत्रांकडून समजतंय.

भारतीय तपास अधिकार्‍यांना हेडलीच्या चौकशीची परवानगी द्यायची की नाही यावर विचार केला जाईल अशी माहिती अमेरिकेच्या गृहमंत्रालयचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी दिली.

close