कनिमोळीच्या जामीन अर्जावर 20 जूनला सुनावणी

June 13, 2011 11:42 AM0 commentsViews: 3

13 जून

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सीबीआयला समन्स बजावलं आहे. सुप्रीम कोर्टाने या समन्समध्ये पुढील मुद्दे उपस्थित केले. स्वान टेलिकॉमने कलैग्नार टिव्हीला दिलेले 200 कोटी रुपये कुठे आहेत ? खालच्या कोर्टात केसची प्रगती कुठपर्यंत पोहचलीय ? आणि 200 कोटीच्या लाचेमुळे सरकारी तिजोरीचं किती नुकसान झालं आहे. या समन्सबरोबरच सुप्रीम कोर्टाने कनिमोळीच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता 20 जूनपर्यंत पुढे ढकली आहे.

close