नाशकात ‘सप्तश्रृंगी इमारत’ पाडण्याचे आदेश ; 15 कुटुंब बेघर

June 13, 2011 11:50 AM0 commentsViews: 2

13 जून

फटाक्यांच्या बेकायदेशीर उद्योगामुळे नाशिकमधील सप्तश्रृंगी अपार्टमेंटमधील 15 कुटुंब बेघर झाली. ही नैसर्गिक आपत्ती नसल्याने त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने झटकली आहे. ही इमारत धोकादायक जाहीर करून महापालिका आयुक्तांनी ती पाडण्याचे तत्काळ आदेश दिले आहे. मात्र इथल्या रहिवाशांची भेट घेण्याचे सौजन्यसुद्धा दाखवलं नाही. मेरीच्या क्वार्टर्समध्ये त्यांची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. पण ही सोय फक्त 24 तारखेपर्यंतच आहे. त्यानंतर राहायचं कुठे आणि कसं हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

close