कॅगने ओढले रिलायन्सवर ताशेरे

June 13, 2011 12:16 PM0 commentsViews: 5

13 जून

कॅगने मुकेश अंबानींवर ताशेरे ओढले आहे. कॅगने पहिल्यांदाच केलेल्या खाजगी तेल कंपन्यांचं ऑडिट केलं. या रिपोर्टमध्ये सरकारने 3 खाजगी कंपन्यांचे हितसंबंध जपल्याचं म्हटलं आहे. यात मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रिज लि.चा समावेश आहे. रिलायन्सने कृष्णा गोदावरी खोर्‍यात उत्खनन करताना कराराचं उल्लंघन केलं. यामुळे सरकारचं मोठं नुकसान झालं. तेल मंत्रालयाने या ड्राफ्ट रिपोर्टला दैनदिन कारवाई असल्याचे म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेल मंत्रालय याबाबत आता चौकशी करणार असून यात तथ्य आढळलं तर कारवाई केली जाईल.

close