पाऊले चालती पंढरीची वाट..

June 13, 2011 2:49 PM0 commentsViews: 13

13 जून

आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी निघणार्‍या गजानन महाराजांच्या पालखीने अकोला शहरातून प्रस्थान केलं आहे. या पालखीचे हे चव्वेचाळीसावे वर्ष आहे.सात जून रोजी शेगावातुन निघालेली ही पालखी विदर्भ,मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आषाढी एकादशीच्या आधी पंढरपुरात पोहचणार आहे.

या वर्षीच्या पालखीत साडेसहाशे वारकर्‍यांचा समावेश आहे. यामध्ये तरुण वारकर्‍यांचा सहभाग लक्षणीय आहे. टाळमृदुंगाच्या जयघोषात पालखी पंढरीच्या दिशेने निघाली आहे. आज पालखी अकोला जिल्हा मार्गे वाशीम जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

त्यानंतर पालखी कन्हेरगाव, औढा नागनाथ मार्गे मराठवाड्यात प्रवेश करणार आहे. सुगीच्या लगबगीतही भाविकांकडून पालखीचं ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं आहे.

close