जे.डे यांच्या हत्येचा पत्रकारांकडून राज्यभरात निषेध

June 13, 2011 2:20 PM0 commentsViews: 2

13 जून

ज्येष्ठ पत्रकार जे.डे हत्येचा निषेधार्थ औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघटनेची तातडीची बैठक घेऊन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी पत्रकार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार असल्याचं पत्रकार संघटनेनं जाहीर केलं.

तर नाशिकमध्येही जे. डे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली. पत्रकारांवरच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी लवकरात लवकर कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रगत राज्य म्हणून गणल्या जाणार्‍या महाराष्ट्रात अडीचशेहून अधिक पत्रकारांवर हल्ले करण्यात झाले आहे. मात्र शासनाचं वेळकाढू धोरण मात्र या घटनांकडून धडा घ्यायला तयार नाही. हिंगोलीतही पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जे.डे यांच्या हत्येचा निषे ध केला आहे.

close