अण्णांना पाठिंबा देण्यासाठी सुंदरी सरसावल्या

June 13, 2011 3:44 PM0 commentsViews:

13 जून

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. आता फॅशन जगतातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. नागपूरमधल्या फॅशन शोमध्ये रॅम्पवर उतरून मॉडेल्सनं आपला हा पाठिंबा दिला.

नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आएनआयएफडी च्या वतीने आयोजित करण्यात आलेला फॅशन शो लक्षवेधी ठरला. इथे नेहमीचा झगमगाट होताच पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी दाखवण्याचा प्रयत्नही या शोमधून केला गेला.

आचल कुमार, मिस इंडिया युनिवर्स 2011 अमृता पत्कीसह अनेक मॉडेल्सनं अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला रॅम्पवर उतरून पाठिंबा दिला.

भ्रष्टाचार थांबवा हा संदेश देणं ही या शोमागची संकल्पना होती. या फॅशन शोमध्ये शंभरहून जास्त विद्यार्थ्यांनी आपण तयार केलेली डिझाईन्स सादर केली.

close