मीनाक्षी पाटील यांच्या पदावर कोर्टाची स्थगिती

June 13, 2011 4:08 PM0 commentsViews: 2

13 जून

मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका मीनाक्षी पाटील यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं होतं. अनधिकृत बांधकामप्रकरणी 27 एप्रिलला आयुक्त सुबोधकुमार यांनी त्याचं नगरसेवक पद रद्द केलं होतं. पण या निर्णयाला आता हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. मीनाक्षी पाटील यांनी आयुक्तांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं.

26 जूनला या जागेसाठी भांडूप गाव वॉर्ड क्रमांक 111 च्या मध्ये पोटनिवडणूकही लागले आहे. शिवसेनेने या पोटनिवडणुकीसाठी मीनाक्षी पाटील यांची मुलगी प्रियांका पाटील हिलाच उमेदवारीही जाहीर केली.

पण आता कोर्टाच्या निर्णयानंतर पोटनिवडणुकीवरच प्रश्नचिन्ह लागलं. कोर्टाच्या निर्णयाची प्रत आता अर्जदार मीनाक्षी पाटील यांच्यातर्फे निवडणूक आयोगाकडे दिली जाईल आणि त्यानंतरच निवडणूक आयोग पोटनिवडणुकीबद्दल अंतिम निर्णय देईल.

close