पुण्यात शाळेनेच दिल्या अकरावीच्या जागा कोचिंग क्लासला

June 13, 2011 4:50 PM0 commentsViews: 2

13 जून

पालकांना विश्वासात न घेता अकरावी प्रवेशाच्या निम्म्या जागा परस्पर एका खाजगी कोचिंग क्लासला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील विखे पाटील मेमोरियल स्कूलमधे उघड झाला. या विरोधात संदीप जोशी या पालकाने हायकोर्टात याचिका दाखल केली आणि कोर्टानंही प्रवेश प्रक्रिया स्थगित केली.

सीबीएसई बोर्डाच्या विखे पाटील स्कूलने गेल्या वर्षीपासून अकरावीची एक संपूर्ण तुकडीच 'फिटजी' या कोचिंग क्लासला दिली. या शाळेत दहावीपर्यंत शिकलेल्या अनिकेत जोशी या विद्यार्थ्याला अकरावी मध्ये ऍडमिशन नाकारण्यात आली इतकंच नाहीे तर ऍडमिशन नाकारण्याचं कारणही दिलं नाही.

त्यानंतर अनिकेत जोशी आणि त्याचे पालक संदीप जोशी यांनी हा प्रकार उघड केला. अनिके त याच शाळेतून 10 वी पास झाला पण त्याच्या 11 वी च्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. शाळेनं सीबीएसईच्या नियमावलीचा भंग करत खाजगी क्लासशी भागीदारी करत शाळेतल्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला.

शाळेच्या मुख्याध्यापकांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर जोशी यांना कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागला. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने काही बोलणार नाही अशी भूमिका शाळेच्या व्यवस्थापनाने घेतली.

close