मूक-बधीर गे जोडप्याला जुळं

June 13, 2011 6:04 PM0 commentsViews: 20

अलका धुपकर, मुंबई

13 जून

जुळं होणं ही काही आता नवलाईची गोष्ट नाही. सरोगसीतून बाळ होणं ही पण नवलाईची गोष्ट नाही.पण या दोन गोष्टी एकत्र आल्या आणि सरोगसीतून जन्माला आलेल्या या बाळांचे पालक 'गे' असतील तर ती मात्र सगळ्यांसाठीच नवलाईची गोष्ट आहे. अशाच दोन मूक – बधीर अमेरिकन 'गे' बाबांना भारतीय सरोगसीतून जुळं झालंय.

ऍलन आणि ब्रायन हे चाळीशी पार केलेलं अमेरिकन गे जोडपं मूक आणि बधीर. कॅनडात त्याचं पहिलं प्रेम फुलंलं आणि त्यानंतर त्यांनी दोन वेळा लग्नही केलं. 16 वर्ष न्यूयार्कमध्ये एकत्र राहिल्यानंतर स्वत:चं बाळ असावे असं स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि स्वप्न पूर्तीच्या शोधात भारत गाठला.

भारतीय महिलेचं एग डोनेशन आणि ऍलनच्या स्पर्ममधून आयव्हीई ट्रिटमेंट केली. आणि सरोगसीच्या माध्यमातून एका भारतीय महिलेनं हा गर्भ वाढवला. एका बाळाची आस लावून भारतात आलेल्या ऍलन आणि ब्रायनला सोथ आणि सोला ही दोनं बाळं झाली. एक मुलगा आणि एक मुलगी. एक मे रोजी त्यांचा जन्म झाला आणि आता ते त्यांच्यासह अमेरिकेला निघाले आहे.

2005 पासून परदेशी 'गे' कपल्स सरोगसीच्या शोधात भारतात येऊ लागलेत. पण भारतीय 'गे' कपल्स अजूनही पालक बनण्याच्या या टप्प्यापर्यंत येऊ शकले नाही. म्हणूनच सरोगसीचा कायदा आला की, भारतीय गे कपल्सना त्यासाठीचा कायदेशीर पाठिंबा मिळू शकेल.

close