विविध मागण्यासाठी अपंगांचे आमरण उपोषण

June 13, 2011 1:59 PM0 commentsViews: 3

13 जून

शहरात राहणार्‍या 70 हजार पेक्षा अधिक अपंगांकरिता पिंपरी-चिचंवड महापालिकेचं धोरण उदासीन असल्याचा आरोप करत शहरातील अपंगांनी आज आमरण उपोषण सुरु केलं आहे. पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू झालं आहे. या आंदोलनाला महापालिकेतील नगरसेवकांसह अनेक संघटनानी पाठिंबा दर्शवला आहे.

महापालिकेतर्फे अपंगाना देण्यात येणार्‍या गाळ्यांचे वितरण करण्यात यावे, महापालिकेच्या अनेक विभागातील नोकरी भरती मध्ये अपंगाना प्राध्यान्य द्यावे तसेच शहरातील प्रत्येक शासकीयकार्यालयात अपंगासाठी रॅम्पची विशेष सोय करण्यात यावी आदी मागण्या अपंगांनी केल्या आहे.

close