गोव्यात भरला इंडो जॅझ महोत्सव

November 12, 2008 12:38 PM0 commentsViews: 2

11 नोव्हेंबर, गोवातुलसीदास चारी गोव्यातली संध्याकाळ संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली. आणि याचं निमित्त होतं पणजीतला पंडित प्रभाकर चारी महोत्सव. भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा सुरेल मिलाप हा पणजीत पार पडलेल्या पंडित प्रभाकर चारी महोत्सवाचं वैशिष्ट्य होतं. कथ्थक नृत्यांगना आदिती भागवतचा परफॉर्मन्स या महोत्सवातलं स्टार आकर्षण होतं. महोत्सवात ज्येष्ठ तबला वादक पंडित चारी यांना त्यांच्या संगीतातल्या भरीव योगदानाबद्दल मानाचा सलाम देण्यात आला. रविंद्र चारी यांचं सतार वादन, ड्रम्सवर गिनो बँक्स, किबोर्डवर मर्लिन डिसोजा, सत्यजीत तळवळकरचं तबला वादन याबरोबरच लक्षवेधी ठऱला तो खुद्द शौनक अभिषेकीचा उत्स्फूर्त सहभाग घेताला. "गेल्या चार वर्षांपासून पणजीत आम्ही पंडित प्रभाकर चारी महोत्सव भरवत आहोत. नामवंत तबलावादक या महोत्सवात येऊन हजेरी लावतात. यंदा काहीतरी वेगळं करावं या इच्छेने आम्ही इंडो झॅजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. लोकांचा त्याला चांगला प्रतिसादही लाभला आहे. दरवर्षी आम्ही अशाच हटके कार्यक्रमांचं आयोजन करणार," असं रविंद्र चारी म्हणाले. अभिनेत्री आदिती भागवतच्या नृत्याविष्कारानं या फ्युजन कॉन्सर्टला चार चाँद लागले. फ्युजन संगीताच्या तालावर संगीतप्रेमींना संध्याकाळ कधी संपली हे समजलंच नाही. पण टाळ्यांचा गजरात झालेल्या समारोपाने कार्यक्रमाचा शेवटही आनंदात पार पडला.