मुंडेंच्या नाराजीची दखल दिल्ली दरबारी

June 14, 2011 9:29 AM0 commentsViews: 5

14 जून

अखेर नाराज गोपिनाथ मुंडेंची दखल दिल्लीनं घेतली. आज सकाळी विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे दिल्लीत दाखल झाले. दिवसभर ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. आणि संध्याकाळी ते भाजपाध्यक्ष नितीन गडकरींची भेट घेतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंडेंनी वारंवार नाराजीचं शस्त्र उपसल्यामुळे त्यांच्या नाराजीची दखल घ्यायची नाही असं दिल्लीतल्या नेत्यांनी ठरवल्याचं समजतंय. परंतु गेल्या दोन दिवसात वेगवेगळ्या पक्षांमधील नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्यामुळे अखेर भाजपला त्यांच्या नाराजीची दखल घेणं भाग पडलं आहे. दरम्यान भाजप सोडणार नसल्याचे मुंडेंनी आयबीएन-लोकमतशी बोलतांना स्पष्ट केलं. दरम्यान रिपाई नेते रामदास आठवले आज गोपिनाथ मुंडे यांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे.

close