हे सरकारला शोभत नाही – पतंगराव कदम

June 13, 2011 5:04 PM0 commentsViews: 8

13 जून

पत्रकार जे डे यांच्या हत्येवरुन वन मंत्री पतंगराव कदम यांनी थेट गृहमंत्री आर. आर. पाटील यांना थेट लक्ष्य केलं आहे. अंडरवर्ल्डच्या युद्धाबाबत पोलीस आधीच चर्चा करतात हे सरकारला शोभत नाही असा टोला कदम यांनी लगावला. पत्रकार संरक्षण कायद्याबद्दल केवळ चर्चा केली जाते मात्र विधेयक मंत्रिमंडळासमोर का येत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सागंलीत पत्रकारांनी डे यांच्या हत्येसंदर्भात निवेदन दिलं. यावेळी ते बोलत होते.

close