सीईटीचा निकाल जाहीर

June 14, 2011 9:59 AM0 commentsViews: 7

14 जून

राज्याचा मेडिकल आणि इंजिनियरींगच्या सीईटीचा निकाल जाहीर झाला आहे. मेडिकल सीईटीसाठी एकूण 1 लाख 92 हजार 685 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 23 हजार 147 विद्यार्थी पात्र ठरले आहे. म्हणजे महाराष्ट्रात 2500 मेडिकल जागांसाठी 23 हजार 147 विद्यार्थी स्पर्धेत आहेत.

विदर्भात 5,215 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर मराठवाड्यात 4,902 विद्यार्थी उत्तीर्ण, उर्वरित महाराष्ट्रात 13,030 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मेडिकल सीईटीमध्ये 54% विद्यार्थी उत्तीर्ण, मेडिकल सीईटीमध्ये 46% विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहे.

केमिस्ट्रीतील चुकीच्या प्रश्नाला सरसकट 1 मार्क देण्याचा निर्णय घेतल्याचे डीएमईआरच्या सहसंचालकांची सांगितलंय. अभियात्रिंकी सीईटीच्या परिक्षेला 2 लाख 54 हजार विद्यार्थी परिक्षेला बसले होते. ते सर्व विद्यार्थी पास झाले आहे. यात नाशिकचा प्रीतेश छाजेड राज्यात पहिला आला आहे.

close