रामदेवबाबांना डिस्चार्ज ; योगा करू नका डॉक्टरांचा सल्ला

June 14, 2011 10:12 AM0 commentsViews: 3

14 जून

गेल्या काही दिवसांपासून देहरादूनच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या बाबा रामदेव यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपोषणाच्या आठव्या दिवशी त्यांचे पल्स रेट कमी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु आता त्यांचे पल्स रेट सामान्य असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी बाबा रामदेव यांना काही दिवस योगा न करण्याचाही सल्ला दिला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी आपण भष्ट्राचाराविरुद्धचा लढा सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

close